कोणी नाही कोणासाठी
कोणी नाही कोणासाठी
कुणी नाही कुणासाठी कोणी कुणाचे नाही
आलो एकटेच जगी वाढविले स्वखुषीत दिले प्रेम पालकांनीमोठे केले सोबतीत
भोगण्यास नाही कुणीस्वकर्माचे कर्म फळमंत्र ठेवा सदा ध्यानीहवे मनी आत्म बळ
वाचा पाढे स्वकर्माचेनको कुकर्म जीवनीभागीदार होत नाही दुःख भोगण्या त्याक्षणी
कर्म सिध्दांत वदलेकृष्ण अर्जुनास रणी कुणी नाही कुणासाठीकर कर्म रणांगणी
आयुष्याच्या सांजवेळीकुणी नाही कोणासाठी आता तरी जगून घे काही क्षण स्वतःसाठी
