STORYMIRROR

Prashant Shinde

Romance

3  

Prashant Shinde

Romance

कोणाला छान म्हणू?

कोणाला छान म्हणू?

1 min
29.4K


ती म्हणाली

साडी कशी आहे..?

मी म्हणालो

कोणाची...?

माझीच की

दुसऱ्या कोणाची..!


मी म्हंटल

छान आहे...!

काय छान आहे ?

लक्ष कुठं असत?

तुम्हाला काही कळत का?

उगाच आपलं हो ला हो..!


बरं.

बरं काय ? सांगा ना

कशी दिसते..?

म्हंटल

साडी की तू.?

छी बाई काही तरीच..तुमचं..!


मी म्हंटल

साडी चांगली म्हणावं

तर तू नाराज होणार

तुला चांगलं म्हणावं

तर साडी बदलावी लागणार

दोन्ही चांगलं म्हणावं

तर मी मूर्ख ठरणार

प्रश्न गंभीर

म्हंटल

जातीच्या सुंदराला काहीही शोभत..!


तशी ती लाजली

साडीही छान दिसत होती

आणि ती ही छान दिसत होती

पटलं मला


आनंद देण्यातच खरा आनंद आहे

कदाचित

हीच सकारात्मकता

म्हंटल

किती छान...!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance