STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Tragedy Inspirational

3  

Neha Ranalkar(Nawate)

Tragedy Inspirational

कोंडमारा

कोंडमारा

1 min
256

नाही होत सहन कोंडमारा तरी

करतोय सहन तो मन मारून |

भावनिक, शारिरीक वि सामाजिक

प्रकार बदले तरी अपमान दारूण | |१| |


आपलं तेच खरं म्हणून अन्याय 

वाटत सुटतो जो तो गल्लोगल्ली |

स्वत:च्या सुखापुढे विचार नसतो

स्वार्थ जगात बोकाळलाय हल्ली | |२| |


 ढोंगीपणा स्वार्थीपणा असतांना

अंगी त्याचेच गुणगान होत राही |

सत्याच्या पुजाऱ्याची मुस्कटदाबी

त्यालाच जग पाण्यांत पहात राही | |३| |


भावनिक सारा कोंडमारा सोसून

उद्रेक त्याचा कधी होतो अनावर |

शेवटी तो ही असतो हाडामासाचा

मानव नाही ना असत जनावर | |४| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy