कोकण..
कोकण..
इतिहासाने पावन भूमी
सह्याद्रीचा मुकुट शोभतो
कोकण मनाला
नेहमीच भुुरळ घालतो
हिरवी गर्द
झाडी घनदाट
लाल लाल मातीतील
नागमोडी वाट
काजूची झाडं नि
आंंब्याची आमराई
नारळ पोफळीच्या बागा
आणि आनंदाचा शिमगा
दरवर्षी गौरी गणपती
मग होत असते कोकणात
चाकरमान्यांची गर्दी
समुद्राच्या कुशीतले सुंदर कोकण
भाषा इथली मधुर मालवणी
रुजते येथे भात आणि नाचणी
