STORYMIRROR

Anju Metkar

Romance Others

4  

Anju Metkar

Romance Others

कोजागिरी

कोजागिरी

1 min
580

निरभ्र नभ हे आज

सवे केशरी सुंदर सांज

मनी उमलती सारे राज

गुलाबी गुपित सांगते गाज ।।१।।

उमलली ही शुक्राची चांदणी

शोभे लोभस नभांगणी

सखे गं ,तारकांची खाणी

अलगद उतरे अवनीवर दीवाणी ।।२।।

पुनवेचा चंद्रमा शितल मंद मंद

पाहून चकोरास होई आनंद

प्रीत बहरते मनी धुंद

वदू कोणा मी अंतरीचा मोद ।।३।।

वृंदावनी गोपिका वेड्या

कृष्णसख्यासवे करीती रासक्रिडा

बावरी राधा उन्मनी गड्या

यमुनातीरी शोधे सवंगड्या ।।४।।

वेणूनादाच्या अमृतधारा

गोकुळी घुमतो नाद सारा

कोजागिरीच्या या पावन अवसरा

प्रतिबिंब उमटे क्षीरात झरझरा ।।५।।

कुठे शोधू मी सख्या प्रियकरा

छळती मज चुकार नजरा

आला गं बाई श्रीरंग गोजिरा

कोजागिरीच्या चांदण्यात साजिरा ।।६।।

उधाण भरे मग चैतन्यास गहीरा

राधा कृष्णाच्या रासक्रिडेत हासरा

यमुनातीरी चढे रंग बावरा

उत्फुल्ल उत्कट प्रितीचा नजारा ।।७।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance