कोडे
कोडे
सोडव हे कोडे आता अडकून पडलोय मी यात
कधी तुझ्या नयनात हरवतो मी
कधी मार्ग सापडतो बाहुपाशात
तुझ्या स्वरातच रेंगाळत बसतो
कधी रेंगाळतो तुझ्या केसात
सोडव हे कोडे आता अडकलो आहे मी यात
तुझ्या पैजनांच्या रुणझुणमधे
जीव वेडावला उत्तर गवसण्यात
सोडव हे कोडे आता अडकून पडलोय मी यात

