कन्यादान
कन्यादान
कन्यादान म्हणजे
माय-बापानी पाहिलेले स्वप्न..
जे खुल्या डोळ्यात
अस रंगून जाते ना...
अंगाच्या चिंध्या होतात
आणि उरतं उपेक्षाचं ओझं..
कोणी हे काढले नियम
बघूनच आक्रोश येतो..
त्यानं आम्हाला मुलीला
पोसून मोठं करावं..
एक दिवशी आम्हीचं
त्याच्या गळाचा फास व्हावं..
त्यापेक्षा त्याने आम्हाला
गर्भातच मारावं...
कसा करणार ?
गरीबांच्या घरात भ्रुण हत्या होतच नाही.
कारण जहर खायला
ही दमडी नसते गड्या..
जसे जसे आम्ही वाढू
तसंच माय-बापाचं ओझं ही वाढत..
माहिती असतं त्यांना
हुंडा रूपी राक्षस एके दिवशी गिळणार...
तरीही तयार असतात ते
या आत्म बलिदानास..
आमच्या सुखासाठी...
