STORYMIRROR

Pandit Warade

Romance Tragedy Others

4  

Pandit Warade

Romance Tragedy Others

कंटाळलो

कंटाळलो

1 min
351

बेगडी प्रेमास मी कंटाळलो आता

मुक्त झालो अन् स्मशानी चाललो आता


तू दिलेल्या त्या फुलांचा हार प्रेतावर

बोचतो थोडा तरी गंधाळलो आता


पावसाळे अन उन्हाळे घेतले माथी

द्यायला अनुभव मुलांना धावलो आता


सावली सोडून गेली सांज वेळेला

आज येथे एकटा सरसावलो आता


छेडते स्वप्नातही मज साजणी माझी

मी मनाशी बावराया लागलो आता


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance