कळले होते
कळले होते
पारायनात स्पदनांच्या माझ्या
स्वप्न तुझेच दडले होते
चांद्रती येऊन स्वप्नांच्या खिडकीत
तू मला छळले होते
रुसव्याचा लपंडाव खेळताना
बंध रेशमाचे जुळले होते
तू नि मी होतो अनोळखी तरी
मनाला गुज प्रीतीचे कळले होते..

