Sarika Jinturkar

Abstract Tragedy

3  

Sarika Jinturkar

Abstract Tragedy

कलियुग

कलियुग

1 min
4


निती जगाची वेगळी 

कोण शब्दास जागतो  

युग लोटले सत्याचे 

स्वार्थ नातेही तोडतो॥१॥


सुख कुणाचे कुणाला

आता नाही बघवत

व्देष जाळे मनाशी

मन राहते विणत ॥२॥ 


नच मानवा कळेना

काय घडेल उद्याला 

अज्ञानाच्या आनंदात

ठेवी मश्गुल स्वतःला॥३॥ 


वाट काटेरी भयाण 

नसे कोणी सोबतीला 

जाता सरूनी यामिनी 

सूर्य येई उदयाला॥४॥


आयतंच काय मिळे 

फल प्राप्ती संघर्षाला 

हाती घेवूनी मशाल 

तूच सार अंधाराला॥५॥


नको आस कुणावरी

गर्द काळोख दाटला 

बदलले विश्व सारे 

कलियुगाचा दाखला॥६॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract