जागर
जागर
1 min
12
देशभक्तीचा जागर
मनामध्ये जागवतो
देशप्रेमासाठी माझे
तन मन राबवतो
देशसेवा हेच व्रत
आधारस्तंभ मानतो
जगण्याची हौस मौज
कुठे सैनिक जाणतो
रणांगण मायभूमी
युद्धभूमी ही प्रेयसी
देशासाठी लढताना
ध्यास असतो उराशी
देश आमचे दैवत
राष्ट्र असे स्वाभिमान
आम्ही देशाचे रक्षक
याचा सार्थ अभिमान
ऋणी आहोत मातेचे
अनमोल दिला जन्म
देश आणि भूमीसाठी
देह झिजवु आजन्म
करू जागर भक्तीचा
लढू देशहितासाठी
मरणाला ही पत्करु
माझ्या प्रिय देशासाठी