STORYMIRROR

Aniket Kirtiwar

Romance

3  

Aniket Kirtiwar

Romance

किती वर्षे...

किती वर्षे...

1 min
8.8K


किती वर्षे वाट बघीतली ह्याच वाटेवर बसुन

तु बघीतलही नाही मला एकदाही मागे वळून

आज आलीस तर परतीच्या बोली चे वचन दे मला

तरंच प्रिये पुन्हा एकदा जाऊ देईन मी तुला


किती आठवणी मनावरी कोरल्या

जागा संपल्यावर कागदावर रचल्या

सुर्य प्रकाश ही लबाड भासला

उदास करूनी रात्री निजला


आज आलीस तर तुझी पडछाया ठेव माझ्या सोबतीला

तरंच प्रिये पुन्हा एकदा जाऊ देईन मी तुला


अगं प्रेम हे असच असते

जे जगाला दिसत नाही ते त्याला दिसते

बघ माझ्या डोळ्यात तुझ अंतरंग वसते

नको बघूस अगं त्यात तुझी पापचं अधिक दिसते


आज आलीस तर खऱ्या पतिव्रतेचं वचन दे मला

मगच प्रिये पुन्हा एकदा जाऊ देईन मी तुला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance