किती रुसतेस तू
किती रुसतेस तू
म्हणतोस मला किती रुसतेस तु
खरं सांग नीट भेटतेस तू
यायला खूप उशीर करतोस
जायला किती घाईत तू
कधी वाटते मला असे रे
नाही माझ्या प्रेमात तू
सारखा हसतो मला फसवतो
असा कसा रे निर्दयी तू
नाही बोलणार तुझ्याशी आता
कितीही विनवणी केलास तू
कदर नाही माझ्या भावनेची
किती नादान बनतोच तू
रडून भांडते भांडून रडते
तरी वेड्या सम हसतोस तू
फुले हवी रे केसात माझ्या
पायात चाळ का घालतोस तू

