किती भाग्यवान मी!
किती भाग्यवान मी!
पुनवेचा शीतल
चंद्र पाहिला
पूर्वेस तेजोमय
सुर्य पाहिला
टपोरे गुलाब
फुलते पाहिले
गंध जाईजुई चा
धुंद प्राशिला !
पडती सारे फिके
तुझ्या पुढे प्रिये !
देऊ कोणती गं
उपमा तुला?
किती भाग्यवान मी
तू लाभली मला!

