#किंमत
#किंमत
स्वाभिमान जपावा पण घेऊ नका मान
सन्मान नाही पण नका करू अपमान
श्रीमंतीला वाटा फार सगळेच जवळ येतात
गरिबीचा सामना करा आपले कोण कळतात
चार दिवसांचे असेल पद एके दिवशी जाते
आयुष्यभराची पुंजी माणुसकी फक्त बरोबर राहते माझ्यामुळे तो मोठा झाला सोडा 'मी' पणा
केलेल्या मदतीत नेहमी दिसू द्या निस्वार्थीपणा
मोठेपणाचा तोरा उगाच मिरवायचा कशाला
तुमच्यातली माणुसकी जाणवू द्या समोरच्याला
अहंकार आला तर सगळंच व्यर्थ होते
केलेल्या मदतीची किंमत कवडीमोल राहते
प्रा.सौ नलिनी लावरे
