STORYMIRROR

Prashant Shinde

Fantasy

4  

Prashant Shinde

Fantasy

किमया...!

किमया...!

1 min
282

उन्हात शिडी लावली आकाशी

अन सारे आकाशच रंगवायला घेतले

म्हंटले सूर्याला बघ आता क्षणात

तुझा दाहच सारा कमी करून टाकतो


दूर वर मेघ राज होता

त्याने ते लक्ष देऊन ऐकले

म्हणाला कलाकार थांब मी पण येतो

तुझ्या मदतीला भरपूर पाणी घेऊन


आणि रंग काम निळ्या नभी

मोठया जोमाने सुरु झाले

तसा वारा ही धावून आला

म्हणाला तू रंगाव मी सुकवतो

हळू हळू सूर्य नजरेआड झाला


नभांची दाटी झाली तसा

वाराही अंदादत नाचू लागला

सूर्याचा दाह ही कमी झाला

तशी वीज आनंदात कडाडली

म्हणाली चमक भरते मी आकाशात

बरसेल बघ पाऊस निमिशात


तेवढीच नक्षी रेखते मी आकाशात

जिद्द कलाकाराची पाहून

वरून राजा प्रसन्न झाला

आणि मनसोक्त मेघ गर्जनेसह

चोहोबाजूंनी धुवांधार बरसू लागला

कलाकार ही तृप्त झाला

म्हणाला धरती मातेला


आई काळजी नको करू

मी रंगवेन आकाश प्रत्येक वेळी तुझ्यासाठी

तशी धरती ही तृप्त होऊन हसली

आणि म्हणाली अरे कलाकारा

तुला प्रसन्न तेचे चित्र रेखाटता यावे

म्हणूनच बघ ना मी हिरवा शालू ल्याले....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy