किमया
किमया


पाखरांची संवेदना,
घरटे त्यांस नसते.
पिलांना सांभाळण्याचे,
बळ पंखात असते.
घाबरतोस काय वेड्या,
दारिद्र्य कुणास नसते.
उन्हात राबलेली,
मिठभाकरी गोड असते.
सुख दुःखाची सावली,
जीवनात कुणास नसते.
काळोखाच्या अंधारात,
उजेड पणतीत असते.
पाखरांची संवेदना,
घरटे त्यांस नसते.
पिलांना सांभाळण्याचे,
बळ पंखात असते.
घाबरतोस काय वेड्या,
दारिद्र्य कुणास नसते.
उन्हात राबलेली,
मिठभाकरी गोड असते.
सुख दुःखाची सावली,
जीवनात कुणास नसते.
काळोखाच्या अंधारात,
उजेड पणतीत असते.