अंतरंग
अंतरंग
1 min
70
घे उंच भरारी क्षितिजा पलिकडची
मनातल्या त्या चक्रवाढ व्याजाची
कधी अंतरी चार पाऊले येतील सुुखदुःखाची
तुझ्यातच लपलेल्या त्या पाऊल खुणांची
तडजोडीच्या जीवनास पंंख फुटू दे आशेेेचे
लोप होऊ देे तुुझ्यात असलेल्या त्या ' मी ' पनाचे
कर समर्थन तुझ्यात गुुंतलेल्या त्या जिवांचे
तुझ्यातच अडकून पडलेल्या त्या भाष्याचे
वाट पाहू नकोस कुणी साद घालेल याची
शांत पाण्यातील त्या अशांंत आवाजाची
घडव तुझी ती प्रतिमा तुझ्याच गुणांची
तुझ्याच कल्पकतेची अन स्वाभिमानाची
जाणीव असू दे तुझ्यातल्या त्या स्वप्नाची
कोमेेजलेल्या त्या पानांतील हिरवळीची
काकदृष्टी असुदे मुुखवट्यातील अंतरंग पाहाण्याची
तुझ्यातच असलेल्या त्या गरूड भरारीची