मैत्रीचा भास
मैत्रीचा भास
1 min
56
मंद वाऱ्याची झुळूक हळूच मनाला स्पर्श करुन गेली.
जातांना कुणालातरी मनात बंद करून गेली.
हळूच कुजबुजली नी स्मित हास्य चेहऱ्यावर उमटवून गेली.
मंद वाऱ्याचे ते कुजबुजने, स्मित हास्य देत होते
पण कळत नकळत मला ते उमजत नव्हते.
क्षितिजांच्या पलिकडचे दिसत नव्हते
पण मनात खोलवर काहीतरी उलगडत होते
जणु मैत्रीचा भास करवून देत होते.
कोण जाणे कुठून ती झुळूक आली, मैत्रीचा अर्थ सांगून गेली
वाट ही चार शब्दांची जणू उमलत्या कोवळ्या कळ्यांची.
