खुशाली
खुशाली
नवलाईची नवलाई,
पाहुणा भेटला ग बाई
विचारता ती खुशाली
"खुशाल" आहे गं ताई।।धृ।।
पोरं सोरं लेकी सुना
सुना त्यांचे ही माहेर
गुरं ढोरं नानी नाना
सगंळ्यांचे ते आजार।।१।।
अडोस पडोस घरं
गुरव काकाचं बरं
सुतार मामाचं घरं
पोस्टमन भाऊ रं।।२।।
शिंपी दादाचं ते कसं
अन् माळी आबाच रं
होळकर बुढी कसी
केसकर अन्नांचं रं ।।३।।
म्हणाली बाचं दु:खणं
बरं हाय का वाढलं
हंसा मामीचं सुकनं
वाढलं का रे थांबलं।।४।।
आणि काय काय पुसू
कुणा कुणाची खुशाली
खुशालीला आज पुसू
बाई" खुशाल" "खुशाल"।।५।।
