खुलता कळी खुलेना
खुलता कळी खुलेना
असे काय ग झाले आज सांग मजवरी का रुसली काही न बोलता कधीची गुमसुम होऊनी बसली 1
न येती आज विचार मनी पाही न वळूनी मजकडे किती मनवावे तुजला कसे काही न सुचे गडे 2
विषय पाहिला बदलूनी नको पद्य तर गद्य पाहू तुझे झरणे कर ना सुरु अशी रुसुनी नको राहू 3
दिन एक पण नसे शक्य तुला न धरिले मम करी उदासीन वाटे दिनभर काय करु तू सांग तरी 4
हाश !हसली तू खुदकन जणू चमकली नभी चांदणी भावना मनी स्फुरल्या बघ धावत आली पहा लेखणी. 5
