खरा माणूस होता ना
खरा माणूस होता ना
खरा माणूस आहे ना जरी अवतार नाही तो
तुझ्या पैशात स्वप्नांना कधी विकणार नाही तो
किती काटे गुलाबाला सुगंधाची तरी चर्चा
मुका आक्रोश पुष्पाचा तुला कळणार नाही तो
मुखवटा काढल्यानंतर किती रडतो तिथे जोकर
नको तू वाजवू टाळी पुन्हा हसणार नाही तो
महासागर किती मोठा तुला दिसतो पसरलेला
कुणाचा थेंब अश्रूचा तुला दिसणार नाही तो
तुझ्या लक्षात राहू दे तुला हे सांगतो पंकज
कितीही फेक चिखलाला कधी मळणार नाही तो
