खळी
खळी
तुजसम खळी वाल्या
असतील इथे लाख
तुझ्या नावानेच माझी
होईल शेवटी राख
तू न झाली माझी तरी
मना आज खंत नाही
खळी जीव माझा तरी
विसंबून मी न राही
उभे राहतील मना
सुख दुःखाचे डोंगर
व्हावी खळीसंग भेट
हा जीवा आज आगर
तुझी छोटीशीच खळी
मज प्रेमधाम भासे
जीव होतो कासावीस
जेव्हा तू ना मज दिसे
माझ्या भावनेचा तुला
न होवो कधीच त्रास
तरी लागली या जीवा
तुझ्या भेटीची ही आस

