खेळते रंग ती
खेळते रंग ती
राग लोभ सारे विसरुनी
रंगात भिजली ति ही 💃
विविधा ती मनस्वी ही
अवखळ मोहिनी ही 💃
खेळता रंग होळीचा ती
हरपते भान धरती ही 💃
राधेच्या रंगात जणू
कृष्ण रंगला आज 💃
खेळे रंग होळीचा ती ही
होई दंग बेभान ती ही..💃
रंग होळीचा चढे नभी ही
आसमंतात भरला वारा अवखळ 💃
ती उमंग असे वारयासम
ती इंद्रधनू धरा जणू..💃
खेळता रंग होळीचा ती ही
उमडते प्रिती हृदयी पुन्हा .. 💃
होई बेभान सवे ती ही
खेळी आज रंग ती ही ..💃

