खेळ नियतीचा
खेळ नियतीचा
त्याच्या मनाने चाललेला
हा सारा खेळ आहे
त्याच्या मर्जीने घातलेला
हा सारा मेळ आहे.
खेळ नियतीने असे
दावले दाटून...
साऱ्या जीवनात भरला
आता अंधार आहे.
फिरुनी भोग येती
नशिबीच आता तुझ्या
तरी उरी चांदण्यांची
लागली आस आहे.
ठेविले दार मनाचे
कळी कुलपात सदा
पण आत भावनांचा
माजला काहूर आहे.
सांगितले किती मी
तुझ्या हळव्या मनाला
दांभिक जगणेच आता
तुझ्या भाळी आहे.
विचारांची तुझ्या इथे
ना कीव कुणाला
तुझ्याच आप्तानी कोंडला
तुझा जीव आहे.
