STORYMIRROR

SAGAR RUDRAKE

Inspirational

3  

SAGAR RUDRAKE

Inspirational

कधी तुलाही माझी आठवण येईल ...

कधी तुलाही माझी आठवण येईल ...

1 min
14.7K


कधी तुलाही माझी आठवण येईल ...

आयुष्याच्या कोपऱ्यात घालवलेल्या क्षणातून

नकळत एक क्षण समोर येईल

कधी तुलाही माझी आठवण येईल

जरी पडला विसर तुला आठवणीचा

श्वासाच्या सुगंधात मी तुझ्या समोर येईल

कधी तुलाही माझी आठवण येईल


म्हणतात जग कोणासाठी थांबत नाही

कोणीकोणासाठी मरत नाही

मात्र आठवन येता तुझी क्षणभर का होईना

क्षण हा माझा थांबतो स्वाश हा माझा घुसमटतो

कधी तुलाही माझी आठवन येईल


सागराला कुठलीच सीमा नाही

तसेच तुझ्या आठवणींचा कधी शेवट नाही

आठवणीं शिवाय दिवस उगवत नाही

रात्र हि तशी सरता सारत नाही

जगणाऱ्या आयुष्यला तुझ्या आठवणी शिवाय काहिच नाही

अशीच कधी तुलाही माझी आठवन येईल


जाणाऱ्यांनी येतो म्हणावं जातो म्हणू नये

असेच येते म्हणता म्हणता तुही कधी तरी येशील

कधी तुलाही माझी आठवन येईल

काही नाही अतूट असतात का कोण जाणे

डोळे पाणावल्या शिवाय का कोण जाणे राहत नाही

माझी आठवण आल्यावर डोळ्यातले पाणी तुझ्या थांबणार नाही

अशीच कधी तुलाही माझी आठवन येईल


बरे झाले असते अश्रुना शब्दात मांडता आले असते

एवढ्या ओळींची कविता माझ्या अश्रू नि भिजवली असती

आयष्याचा शेवट तुझ्या कुशीतच होईल

कधी तुलाही माझी आठवण येईल

कधी तुलाही माझी आठवण येईल ......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational