STORYMIRROR

SAGAR RUDRAKE

Inspirational

3  

SAGAR RUDRAKE

Inspirational

कविता....

कविता....

1 min
14.2K


तुझ्या आणि माझ्यातले अंतर म्हणजे कविता...

शब्दांना बोलावते ती ही कविता...

शब्दांच्या कोषातून सांडते ही कविता..

हळुवार स्पर्श करते ती कविता ...


फुलांच्या सुगंधातून दरवळते ही कविता ...

झुळूक येत वाऱ्याची हसते ही कविता...

मोहांच्या या चार क्षणाला भूलवते

नात्यांना जोडते ती ही कविता..


मनाला मनाशी जोडते ही कविता..

लेखकाची लेखणी ती एक कविता...

जगण्याची मजा सांगते ती कविता..

दिवसही रात्र करते अशी ती कविता ...


आनंदाचे माधुर्य वाढवते ती कविता ...

आयुष्याचं कोडं उलगडते ती कविता..

गुरूला शिष्याशी जोडते ती कविता..

भक्ताला भक्तीच्या प्रेमात पाडते ती कविता..


डोळ्यांना अश्रूशी जोडते ही कविता..

हृदयाला श्वासाशी बांधते ही कविता..

प्रेमालाही प्रेमात पाडते ही कविता..

कवीची ओळख हीच ती कविता...


देवालाही प्रश्न पडावा कोण ही कविता...

कोण हा कवी कोण ही कविता??

कवीला कवी बनवते ही कविता..

कवीला कवी घडवते ही कविता...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational