माझी होशील का ...
माझी होशील का ...
मनातल्या माझ्या मनाशी बोलशील का
माझी होशील का
सुन्या मैफिलीत कधी येऊन बसशील का
माझी होशील का
डोळ्यातल्या पाण्यानी कधी चिंब भिजशील का
माझी होशील का
खळखळणाऱ्या पाण्याशी कधी हळूच बोलशील का
माझी होशील का
हृदयाचे गाणे कधी ऐकून घेशील का
माझी होशील का
दुःखाच्या सागरात कधी सुखाचे दोन क्षण देशील का
माझी होशील का
निर्जीव या दगडात स्पर्शाने जीव ओतशील का
माझी होशील का
वाट चुकता आयुष्याची रस्त्यात अशी भेटशील का
माझी होशील का
सूर्य आणि चंद्र बरोबर दररोज अशी दिसशील का
माझी होशील का
घालवलेल्या क्षणांची जाणीव पुन्हा करून देशील का
माझी होशील का
दोन श्वास मधल्या अंतरात मलाही एक क्षण देशील का
माझी होशील का
मिटता डोळे स्वाश थांबता क्षणभर तरी भेटशील का
माझी होशील का
एकदा माझी होशील का...

