STORYMIRROR

Shabd Gandh

Romance

3  

Shabd Gandh

Romance

कधी तरी....

कधी तरी....

1 min
124

कधी कधी मला वाटतं! मनापासून!! 

मी फोन केला की तू मला म्हणावं… 

हाय मेरे जानेमन! जानेजिगर!! जाने-बहार!!

आय मिस्ड यू व्हेरी मच!!

आय लव्ह यू व्हेरी मच!! 

कधी एकदा तुला भेटतोय असं झालंय!! 


वीडियो कॉल केला तर तुझ्या डोळ्यात ती नशा दिसावी!

तुझ्या ओठांची थरथर!! 

तुझ्या आवाजात तो अधीरतेचा कंप!! 


कधी कधी म्हण ना… 

तुझी खूप आठवण येतीयं! 

तुला आत्ताच्या आत्ता भेटायचंय!! 


कधी म्हण ना… 

आत्ता असं वाटतय की तुला मिठीत घ्यावं! 

दोघांनी विरघळून जावं!! 


कधी म्हण ना… 

तुला बघायचंय डोळे भरून!! 


कधी म्हण ना… 

तुझ्याशी खूप खूप बोलायचंय! 

अगदी भरभरून!!


कधी म्हण ना… 

तुझ्याशिवाय काहीच छान वाटत नाही! 

सगळं कसं सुनसुनं वाटतंय 

कुठेही मन लागतच नाही!! 


कधी म्हण ना… 

तुम्हे गले लगाना है! 

आत्ता फक्त आणि फक्त तुझाच विचार आहे!! 


कधी म्हण ना… 

अजून थोडा वेळ थांब ना! 

अजून थोडं बोल ना!! 


कधी म्हण ना… 

माझ्या जवळच रहा! 

कधीच जाऊ नको नाहीतर!! 


कधी तरी! काहीतरी कारण काढून मला थांबव ना!! 

माझ्या वर चीड! रागव!! 

असं करून तरी मला थांबवून ठेव!! 


कधी तरी माझ्यावर हक्क सांग! 

कधी तरी चिडून म्हण… 

कुठे होतीस इतका वेळ? 

किती वाट बघायची? 

किसी बहाने से कभी मुझे रोको!! 


कधी म्हण ना… 

रात्री झोपताना शेवटचा विचार तू असतेस! 

अणि सकाळी पहिला विचार तू असतेस!! 

कधी म्हण ना! 

कधी तरी म्हण ना!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance