STORYMIRROR

Devendra Ambekar

Abstract

4  

Devendra Ambekar

Abstract

कधी मिळेल स्वातंत्र्य मला?

कधी मिळेल स्वातंत्र्य मला?

1 min
402

घरी कन्या रत्ने चा

जन्म होऊ नये

म्हणून गर्भाचा

अंत करणाऱ्यांनो

कधी मिळेल

स्वातंत्र्य मला?


लाच खाऊन

पोटोबा तुमचे

भरत नाही

म्हणून आमची

शिकार करणाऱ्यांनो

कधी मिळेल

स्वातंत्र्य मला?


घरून निघता

क्षणी प्रश्न

पडतो की

पोहचेन का

माझ्या ध्येयाशी

कधी मिळेल

स्वातंत्र्य मला?


जे शरीर माझं

तेच तुमचं

तरी ही

शारीरिक खेळ

तुमचे चालूच

पापी नजरा 

कधी मिळेल

स्वातंत्र्य मला?


जीव गेला

काढून गळा

तरी आले

नाही मदतीला

शेवटी माझाच

अंत झाला

कधी मिळेल

स्वातंत्र्य मला?


दुसऱ्याचे प्राण

वाचवणारी

आज स्वतःचे

प्राण हरवून

बसली नाय

पाहवत मला

कधी मिळेल

स्वातंत्र्य मला?

       


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract