कधी कळेल पावसा तुला (मुक्त छंद)
कधी कळेल पावसा तुला (मुक्त छंद)
असा कसा रे तू पावसा
कधी कळेल रे तुला
तुजवरीच अवलंबून असे सृष्टी,
तरी तू कान ठेवीशी
कृपादृष्टी तिजवरी
वसुंधरा पहा कशी करितसे भ्रमण
नित्य नेमाने अविरत ,
म्हणूनची जगी चालतसे
ऋतू चक्र ते नियमित
पण, पावसा तूच का
करिशी चूकारपणा,
राहतोस आडूनी दावण्यास
तुझाच मी - पणा
येतोस न कधी वेळेवर
करीतोस उशीर
पाण्या विना पहा ,
काळी माय आसुसते अधीर
तुजविण शिवारे कशी डौलणार
जल - चर सृष्टी सांग बरे जगणार
तुझ्या , वेळेत न येण्याने
तर कधी ,अवचित येऊनी
अती वृष्टी करण्याने
घरेदारे जाती वाहूनी
जन मनास करीतोस बेजार
उभे पीक दाण्यासवे
पाहून होतो मोद मनात
पण ,तुझ्या अती वृष्टीने
कधी सुका , तर कधी ओला
दुकाळ येई नशिबी
