कैद पक्षी
कैद पक्षी
या भयान पिंजऱ्याच्या
चौकटीत अडवू नको
छाटलेल्या पंखांना पुन्हा
रक्तबंबाळ करू नको
मुक्त श्वासांना
वरवंट्यात पीसू नको
आयुष्याच्या रंगात
दुखाचा रस ओतू नको
जगण्याला अर्थ नाही
नकोसं करू नको
केविलवाण्या डोळ्यांना
आंधळं जग दाखवू नको
तुझ्या भामट्या विचारांना
पालवी फुटेल तर
सजीव पक्षाला
निर्जीव करू नको
