कायबा धोंडिबा
कायबा धोंडिबा
हसनचं सोडल
मातिशी जोडून होता
आता काय धरलं ?
कसं काय तू
इसरला असा
आईशी नाळ
तोडून बसला कसा?
अरे असंकसं हे
चालनं कुठवर
व्याकुळ मातिवर
धर जरा वखर...!
भुक तुयी भागवल
हिच कायी आई
ओसंडून दाने
तुया हाती येई
अस्सा धिर सोडून
जाऊ नको आता
कोणाच्या फुसक्या
एकू नको बाता
दिनरात राबून राजा
ईहिर थो खनली
निसर्गांन दिला दगा
वाट तुयी लागली
धिर धर जरा
या वर्षी येन पाऊस
दुष्काळ सरल
अस्सा कायजित
नको राहुस
ह्या मातिशी हाय
जुडल तुव्ह नात
तोडू नकोस हे
जन्म जन्मी च नातं
ईथच जनमलो
ईथच जाचं हाय
पाय कशी धरती माय
तुहयाकड़े पाहे....!