काय हव मला
काय हव मला
काळानुसार बदलती इच्छा
संपता गृहस्थाश्रम जीवनात
सहज जाते लक्ष समाजाकडे
अपेक्षा वाटे असे हवे समाजात
काळा प्रमाणे चालणे
असे सदैव गरज
येता वेळ प्रसंग तसा
बदल करावा सहज
नव नवीन विचार
त्याचे करावे स्वागत
करु सणवारात परिवर्तन
ऐका मनाचे स्वगत
फटाक्यांच्या आवाजाने
होते हवेचे , ध्वनीचे प्रदुषण
नको -हास पर्यावरणचा
कमी करुया दुषण
आणू मातीचे दीपक
खुश होतील कामगार
काम करणाऱ्या हातांना
मिळेल आपोआप आधार
फराळ देता अनाथांना
विलसेल हास्य मुखी
आनंदाने प्रफुल्लित
दिसतील सारे सुखी
दुःख मय तो तिमीर
लावुनिया दीप ओळी
घर अनाथांचे उजळवू
काढू सुंदर रांगोळी
असे हवेत बदल समाजी
हेच आहे मनाचे मागणे
काय हव मला नको विचाराणे
ह्याचीच पूर्तता होवो सांगणे
