STORYMIRROR

Vijay Sanap

Tragedy

4  

Vijay Sanap

Tragedy

कावळा

कावळा

1 min
1.2K

खडे टाकून सुद्धा

पाणी येईना वर

माठ होता कोरडा

त्यात उन्हाची भर ।।


पाणी शोधासाठी

व्याकूळ झालं मन

अंगाची होते लाही

होरपळलेलं तन ।।


जीव गेला दमून

खडे जमा करुन

नाही मिळाले पाणी

गेला कावळा मरुन ।।


कत्तल करून सारी

मानवाने केली मात

झाडे लावण्याआधी

केला होता घात ।।


पाण्यावाचून तो

इाला होता मृत

काय म्हणे कावळा

प्याला होता अमृत ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy