STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

कार्य अण्णाचं

कार्य अण्णाचं

1 min
0

कार्य अण्णाचं महान 


माझ्या अण्णाचं कार्य लई महान 
घेतले दिड दिवस शिक्षण 
साथ दिली नाही गरीबीन...ग शेजारीन सखे बाई

लोक गिते पोवाडे गाऊन 
कार्य केले समाजसुधारक म्हणून 
महान बनले गरिबीतून.ग..

बॅक फोडली होती फकीरानं
आणला इंग्रजांचा पैसा लुटून 
स्वार्थी सरकारला दिले शिक्षण.ग..

वालूबाईच्या पोटी तो जन्मला 
तोंड देऊन गरिबीला
कादंबरीकार शाहीर तो झाला.ग..

गरीबांचा नेता म्हणून 
रशियात मिळविला मान
टाकला समाज सारा बदलून.ग..

कादंबरीतून शाहिरीतून 
मार्गदर्शन केले समाजाला 
...शाहीर सांगतो आपणाला...ग.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract