STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Children Stories Action Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Children Stories Action Inspirational

चिंचेचे झाड

चिंचेचे झाड

1 min
0

चिंचेचे झाड...

 भले मोठे झाड चिंचेचे उभे आमच्या दारी
 झाडावर पक्ष्यांची घरटी कितीतरी.
 सरसर सरसर खारुताई चढते झाडवर,
उड्या मारी ती फार या फांदी हून त्या फांदीवर.
 चिमणी, कावळा, कबूतर, पोपट पक्षी येती रोज, चिवचिव, कावकाव किलबिल न्यारी
पहावे वाटे मौज.
 चिंचा खावया वानरांचा कळप मोठा येई, झाडाखाली चिंचाचा हा सडा अंगणी होई...

 आम्ही मुले ही या झाडावर सरसर रोजच चढतो खेळतो,पळतो,पडतो तरी ही कधीच न रडतो...
 झाडाखाली रोज चालतो आम्हा मुलांचा डाव, गावची साऱ्या मुले खेळती पहातो सारा गाव
 उन्हाळ्यात ही थंडगार सावली झाड हे देई,
अन् चांदण्या रात्री कशी झोप छान येई...
 या झाडाच्या फांदीवर ती चला झोके घेऊ, मिठ लावून चटक मटक चिंचा रोज खाऊ...

 गायकवाड रवींद्र दापकेकर नांदेड


Rate this content
Log in