कामगार
कामगार
का म्हणून देता तुम्ही कामगारांना
शुभेच्छा
सरकार कोणते का असेना
कामगारांची तीच दशा
का म्हणून देता तुम्ही
कामगारांना शुभेच्छा
बढती वर्षाला मिळत नाही
हजाराच्या पुढे पगार वाढत नाही
किती विनवणी करू मालकाला, म्हणूनच
का म्हणून देता तुम्ही कामगारांना शुभेच्छा
महिन्याला किराणा भरून हा
झालो उधारी बेरोजगार
कष्टकरी माणसांवर लक्ष नाही देत ही सरकार
का म्हणून देता तुम्ही कामगारांना शुभेच्छा
मंत्री म्हणो आमदार म्हणो कधीतरी भेट द्या
जाणून घ्या आमच्या व्यथा न्याय आम्हाला द्या
