कामगार आम्ही....
कामगार आम्ही....
कामगार आम्ही, करताे सर्जनशील नवनिर्मिती,
आमच्यामुळेच येते वैभव, अपेक्षित कामाला गती..
कामगार आम्ही, वंदन करताे प्रत्येक श्रमीकाला,
कष्टातून सृष्टी फुलते, न्याय मिळावा घामाला...
कामगार आम्ही, कामातून आम्ही विश्व फुलवताे,
कष्टाची घ्यावी दखल, सदा कष्टाचे मंगलगान गाताे..
कामगार आम्ही, सदैव पेरताे मेहनतीची छाया,
कामगारदिन आमचा गाैरव, फुलते अभिमानाने काया
