काळा दिवस
काळा दिवस
दिवस आजचा काळा
जरका उगवलाच नसता,
तर माझा अण्णाभाऊ
भारतरत्न झाला असता.
साहित्यरत्न ही ओळख अण्णाची
लेखणी खरी ती तलवार त्यांची
होती खरी त्यांना चीड अन्यायाची
जगात किर्ती महान या शाहीराची.
असा कादंबरीकार, कथाकार, गीतकार, नाटककार, लोकशाहीर सोडून गेला नसता...
चित्रपट स्रूष्टीत अण्णा हिरो खरा असता
निर्माता, दिग्दर्शक
महान अभिनेता
साऱ्या जगात, विद्यापीठात
असत्या अण्णांच्या कादंबऱ्या, कथा
अचंबित सारं ती पाहून विद्वत्ता..
दीड दिवसाचं शिक्षण
साऱ्या जगाच अनमोल ज्ञान
साऱ्या जगात आदर्श महान
हे एकनंबरी सोनं
साऱ्याजगात प्रकाश ह्या ताऱ्याचाच असता...।
असता कामगारांचा न्याय
नसता मुळीच अन्याय,
समतेचा रोऊन पाय
दूर झाले असते सर्व भय.
सर्व जगात अण्णांचाच बोलबाला झाला असता...।

