काळ बदलला
काळ बदलला
मुलगी होता
बाईवर खापर
करू नका
तिचा गैरवापर
तिचा यात
दोष काय
ती तर
प्रेमळ माय
मुलगा झाला
की पेढा
कधी सुटणार
हा तिढा
बर्फी मागवता
होता मुलगी
कधी होणार
भावना जागी
मुलगा मुलगी
का भेद
वाटतो याचाच
मोठा खेद
भेदभाव कशाला
त्यांच्यात हवा
विचार करूया
आज नवा
मुलीचे करू
उत्साहाने स्वागत
बदलू गतकाळातील
जरा मत
मुलगा मुलगी
चमकते तारे
दोघेही आहेत
तेवढेच न्यारे
