STORYMIRROR

शशिकांत राऊत

Tragedy Others

4  

शशिकांत राऊत

Tragedy Others

* काजवा *

* काजवा *

1 min
403

लहानपणीचे खेळ गमतीचे,

बाटलीमध्ये त्यांचे चमकणे,

काळोखात मजा पहाताना,

उतरते नभीचे सुंदर चांदणे।।


भुंग्यांच्या त्या कुळी असती,

भारतामध्ये नऊ दहा जाती,

झाडाच्या खोडी,पाणथळी,

पावसाळी मादी अंडी देती।।


अंडी,अळी पुढे काजव्याचे,

रुपांतर काळ लागते वर्षाचे,

वर्षभराच्या खडतर प्रवासा,

जीवन दहा पंधरा दिवसाचे।।


झाडे, झुडुपे कत्तल करुनी,

मानवाने केली निसर्ग हानी,

काजव्यांचं प्रजनन वाढीस,

केला अंत नवंनवी शहरांनी।। 


अंधारात लुकलुक करुनी,

नरमादी मिलन आकर्षणी,

रजनीसंगे निसर्ग उजळूनी,

शोभा पहावी छान देखणी।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy