काहूर...
काहूर...
दाटून आभाळ आले सोबत डोळेही भरून आले मनात हुरहूर हदयात काहूर 💧
पाऊस रूते खोल जखमांवर💧
साऱ्या दुखर्या आठवणींचा अंगार 💧
सांधताना पावसाला घरभर पसरलेल्या माय व्हायची किती बेजार 💧
डोक्यावरचा पदर उबदार माय बापाची कुचंबना तेव्हाच कळली होती 💧
मोठेपणी शिकून मोठे घर घेण्याची इच्छा तिथेच जन्मली होती 💧
घर कोरडे कराया माय शोधते कपडा सुका 💧
बापाच्या घामाचा वास धुण्या सारा पाऊस पडे फिका 💧
आला पाऊस पाऊस आला पाऊस पाऊस सारे घराच्या दाराआड💧
आला पाऊस पाऊस जीव मायेच्या पदराआड 💧
आता घर इतकं मोठं मजबूत पाऊस कधी येऊन गेला हे समजत नाही💧
साऱ्या सुखसुविधा घर जोमान ऊभ 💧
आईच्या पदराची कुठे हरवली ऊब 💧हा करून विचार मनी उठते काहूर 💧
