काहूर
काहूर
तुझा सहवास नकोसा वाटतो
सारे अस्थित्व हिरावून घेतो
तूच तूच मनात असतोस
म्हणून तू समोर दिसतो
तू नसताना वेळ जातो
मन तू येण्याची वाट पाहत
तू असताना काहूर माजतो
मन वेड लावून बेधडक वागत
एकांत सहवत नाही
मन तुझ्यापासून दुरावतच नाही
बंधनात अडकायच नसतं
कळतं पण वळत नाही
प्रेम एकतर्फी नसतं पण
चित्त दुसऱ्या कशात रमत नाही
तुझ्या विचारांशिवाय मग
कुठलं कामच उरत नाही

