Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Poonam Wankar ( पूरवा )

Romance

4.0  

Poonam Wankar ( पूरवा )

Romance

का, यालाच प्रेम म्हणतात..?

का, यालाच प्रेम म्हणतात..?

1 min
206


उदास माझ्या मनाचे

आज बघ फुलपाखरू झाले

तुझ्या स्वप्नांच्या पंखानी

उंच उडाया लागले..;

त्याच साऱ्या जुन्या गोष्टी

आज नव्या-नव्याश्या वाटतात

ज्या पूर्वी नको असायच्या

त्याच हव्या-हव्याश्या वाटतात..

सांग ना..

का.., यालाच प्रेम म्हणतात..??


जे जगायचं राहिलंय

ते सारंच जगावंसं वाटतंय

तुझ्या अंगणातील पावसात

चिंब भिजावंस वाटतंय..;

खळखळणाऱ्या झऱ्यांसवे

मनसोक्त हसावंसं वाटतंय

न जाने का आज पुन्हा..

नव्याने जगावंसं वाटतंय

खरच.. सांग ना...,

का.., यालाच प्रेम म्हणतात..??


तुझ्या हसण्यामध्येच

हसू माझं शोधावं वाटत

तुझ्या पापण्यातील आसवांना

माझं म्हणावं वाटत..,

सुख-दुःखाच्या या वाटेवरती

सोबत चालावंसं वाटतं

तुझं-माझं संपवून

आपलं म्हणावंसं वाटत..;

फक्त.. एकदाच,

सांग ना..,

का.., यालाच प्रेम म्हणतात..???

जर हो..???

तर हो...!! आहे माझं प्रेम तुझ्यावर...,

खूप खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance