का मी दूर एकटा...!
का मी दूर एकटा...!
अनेकांची आहे साथ
दुराव्यास नाही जागा
सगळ्यांचीच आहे माया
तरीही का मी दूर एकटा
क्षणोक्षणी जवळीक
तडफडतो जेव्हा जीव
पाठीवर पाठिंब्याचा हात
समजुतीची तेव्हा कीव
एकांताचा असा लळा
लेखणीचा बोलबाला
निराशेची नाही वानवा
म्हणून मी दूर एकटा
