STORYMIRROR

Savita Jadhav

Romance

3  

Savita Jadhav

Romance

का दूर मी एकटा

का दूर मी एकटा

1 min
11.5K

येणार होती तू भेटायला कारण,

१४ फेब्रुवारी,व्हँलेंटाईन डे होता,

बघत होते सगळे टकामका,

असा का उभा, का दूर मी एकटा.

द्यायची होती वचने, घ्यायच्या होत्या शपथा,

ठरवायचा होता पुढील आयुष्याचा टप्पा,

खूपच वाट पाहत होतो तुझी मी बापडा,

का नाही आलीस, का दूर मी एकटा.

तुझी चाहूल पण नाही,

आली उन्हं डोक्यावर,

ठणकू लागला माथा,

तरीही का दूर मी एकटा.

न येण्याचे कारण,

सांगायचे तरी एकदा,

मेसेज तरी पाठवावा एखादा,

अजून किती थांबू, दूर मी एकटा.

अंधारल्या चारही दिशा,

धूसर झाल्या वाटा,

तुझी वाट पाहता पाहता,

अजूनही, का दूर मी एकटा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance