जवळी घ्याना राया...
जवळी घ्याना राया...
पुढ्यात असूनही
तुम्हा कसं दिसंना,
रोजचाच दुरावा
आता हा सोसवंना.
बघा ना ही
नाजूक कोमल काया,
अन घ्याना असं
मला जवळी राया.
तुमच्यासाठी जागून
काढल्या कित्येक राती,
कशी मी दडवू
अशी ही मनातील भिती.
येता वेळ जवळी
साजना मिलनाची,
वाढू लागे धडधड
ही अशी काळजाची.
येताल ना परतूनी
तुम्ही अशा चांद रातीला,
करूनी शृंगार मी
तयार राहील स्वागताला...

