जुळले नाते.
जुळले नाते.


या जाण्याचे झालं गाणे
तुझ्यावरी ग जडली प्रीती
रुजून येता प्राणातुनी ती
जुळली आता नवीन नाती.........
मंतरली ही हवा फुलांनी.
गंध दरवळे वातावरणी
नावे आपुली पानोपानी.
फुलपाखरे कोरून जाती (१).
चंद्र नसावा तो
वरकरणी
हाती त्याच्या निळी लेखणी
लिहित राहो तो ही प्रितीचे
गीत चांदण्या राती. (२)
वळीव आला वसंत काळी
घडले जणू हे ठरल्या वेळी
तुझे नि माझे जुळले अंतर
स्वप्नं सागरा आली भरती (३).