जर शक्य झालं असतं?
जर शक्य झालं असतं?
सखे खरंच
तुला घेऊन गेलो असतो
त्या क्षितीजापल्याड
अन् दाखवले असते तुला
तूच आहेस
इथे, तिथे अन् तिकडेसुद्धा
सांजभरल्या नभावरून.
तांबूस रंगात
तुझा हात धरून
वारा तुडवत
पावसात भिजत
आभाळाला कवेत घेत
तुला घेऊन गेलो असतो
इंद्रधनू होऊन
त्या आभाळाला साद घातली असती
त्या सुर्यास्ताची गुलाबी आभा
तुझ्या ओठांवर विरली असती
पाखरू बनून गेलो असतो
त्या ढगाआड
अन् शोधले असते
इंद्रधनुष्याचे उगमस्थान
अथवा पाहिले असते
तांबूस सूर्यबिंब
आणखी जवळून
सखे खरंच तुला घेऊन गेलो असतो
जर शक्य झालं असतं.

